Pune News : पुण्यातून दोन सख्ख्या बहिणीसह तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमानतळ आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यातील दोन मुली या सख्ख्या बहिणी आहेत. विमानतळ आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की विमानतळ परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या 17 आणि 14 वर्षीय अल्पवयीन मुलींना अज्ञात आरोपीने आमिष दाखवून पळवून नेले आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन 17 वर्षीय तरुणीला अज्ञात आरोपीने पळवून नेले आहे. याप्रकरणी या मुलीच्या 40 वर्षीय आईने तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.