Chinchwad Crime News : ताथवडे, मोशी, निगडीत तीन मोबाईल हिसकावले

एमपीसी न्यूज – ताथवडे, मोशी आणि निगडी येथे रस्त्याने जाणा-या तरुणांच्या हातातून चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेले. या तिन्ही प्रकरणी गुरुवारी (दि. 30) वाकड, एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यश अशोक कळकुंबे (वय 16, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 26 डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास यश ताथवडे येथील सर्व्हिस रोडने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी यश यांना शिवीगाळ करून त्यांच्या हातातून आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

तुषार भाऊसाहेब पवार (वय 27, रा. बोराडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तुषार हे गुरुवारी (दि. 30) सकाळी कामावर निघाले होते. सकाळी सव्वासहा वाजता मोशी येथील बस स्टॉपवर जात असताना एका दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील सात हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

संदेश सुरेश पांढरे (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी संदेश बुधवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजता भेळ चौक, निगडी येथून रस्त्याने पायी चालत घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी संदेश यांच्या हातातील 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.