Bhosari : तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नोटरी सर्टिफिकेट सापडल्याचे सांगत त्याबदल्यात तीन लाख रुपये पैशाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

राधाबाई बालाजी गवते (वय 36, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), शिवाजी धनगे व पिंपळे गुरव येथे राहणारा एक अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल भिमाजी राक्षे (वय 44, रा. राक्षेवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. 23) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 27 ऑक्‍टोबर 2019 ते 16 नोव्हेंबर 2019 या कालावधीत गुरूविहार कॉलनी, पांजरापोळ, भोसरी याठिकाणी घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना भारत सरकारचे नोटरी सर्टिफिटेक सापडले असल्याचा फोन फिर्यादी राक्षे यांना केला. या नोटरी सर्टिफिकेटस्‌च्या बदल्यात तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1