Pune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या रुग्णांना नायडू रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, यापैकी तीन जणांची तपासणी ही निगेटिव्ह आली आहे. एकाचा निदान अहवाल गुरुवारी येणार आहे. 

चीनसह कोरोनाचा प्रादुर्भाव असलेले 4 पुणेकर आहेत. दोघांची घशातील द्रवपदार्थाचे नमूने दोनदा एनआयव्हीव्दारे तपासण्यात आले आहेत. तपासण्यांत त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांसह मंगळवारी आलेल्या एका प्रवाशाचे आणि बुधवारी सकाळी आलेल्या एका प्रवाशास नायडू रूग्णालयात तपासणीसाठी ठेवण्यात आले असून, या दोघांच्याही घशातील द्रवपदार्थाचे नमूने बुधवारी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.

यापैकी एका प्रवाशाचा तपासणी अहवाल आला असून, तो निगेटिव्ह आहे. पुन्हा तपासणी झाल्यावर संबंधित तीन जणांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.