Pune : तीन पिस्तुल, सहा काडतुसांसह तिघे जेरबंद; सिंहगड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलिसांनी एका कारमधून आलेल्या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तुल आणि सहा काडतसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील आठ दिवसात कारवाई करत सात पिस्तुल पकडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायात वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसात शहरात 10 खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. चोरी, मारामारी, गँगवर अशा घटनाही होताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.