Serial burglars arrested : घरफोडी करणाऱ्या तीन सराईतांना फरसखाना पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज : फरसखाना व आसपासच्या परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन चोरांना फरसखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.(Serial burglars arrested)यामध्ये पोलिसांनी सुमारे चार लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिसांनी 21 सप्टेंबर रोजी मंगळवार पोठ येथील कोंबडी पूल येथे केली.

चाँद  बाबू सय्यद (वय 20 रा.खडकी), सोहेल सलीम सय्यद (वय 19 रा. विश्रांतवाडी), रोहीत नानाभाऊ लंके (वय 22 रा. विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसरखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अमंलदार समीर माळवदकर हे परिसरात गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, चाँद व त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वी घरफोडी (Serial burglars arrested) केली असून ते कोंबडीपुल येथे थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले.त्यांच्याकडील 1 चांदीचे पैजण, सोनसाखळी, दोन अंगठ्या असा एकूण 78 ग्रॅम वजनाचे 3 लाख 90 हजारांचे दागिने जप्त केले. आरोपींवर फरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon-Dabhade fraud : नफ्याचे आमिष दाखवत महिलेची 72 लाखांची फसवणूक

 

ही कारवाई फरसखाना पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अमंलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, गणेश दळवी, किशोर शिंदे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्टे, (Serial burglars arrested) संदिप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजय शिंदे, अर्जुन कुडाळकर, शशाकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.