Bhosari : मोपेड दुचाकीवरील तीन चोरट्यांनी तरुणाचा मोबईल पळवला

एमपीसी न्यूज – हातात मोबईल फोन घेऊन थांबलेल्या तरुणाचा मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी मोबईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री सव्वाआठ वाजता नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली घडली.

नितेश विजय काकडे (वय 31, रा. पिंपळवाडी, ता. जुन्नर) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काकडे नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली मराठा हॉटेल समोर थांबले होते. त्यावेळी मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ वाय 2298) वरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.