Pimpri : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी तीन ट्रक धान्य रवाना

एमपीसी न्यूज  – केरळमध्ये आलेल्या पुरामुळे दहा लाखापेक्षा जास्त नागरिकांची सोय निवारा शिबिरात केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी मदत केंद्र व निवारा शिबिरे सुरु केली आहेत. यासाठी आवश्यक असणारे धान्य व साफसफाई साहित्याने पूर्ण भरलेले तीन ट्रक स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून केरळमधील पोलक्कड केंद्रासाठी रवाना करण्यात आले. 

यावेळी खासदार अमर साबळे, रोटरी क्लबचे सुभाष जयसिंघानी, राकेश सिंघानिया, अशोक लुल्ला, सावरकर मंडळाचे विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, अमित गावडे, राजू मिसाळ, माऊली थोरात, उन्नीकृष्णन, एकनाथ पवार, राजेंद्र बाबर, रत्नाकर देव, विजय सिनकर, सुमती कुलकर्णी, विवेक जोशी, श्रीकांत मापारी उपस्थित होते.

भास्कर रिकामे म्हणाले, “केरळमधील स्वयंसेवकांच्या मागणी नुसार तातडीची गरज म्हणून निवडक वस्तू जमा करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केले होते. त्यास अनुसरून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी व्यक्तीगत पातळीवर तसेच विविध संस्था, कंपनीतील कामगार, विद्यार्थी यांनीही मोठ्या प्रमाणात साहित्य जमा केले. रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी सहा टन तांदूळ, डाळी याबरोबरच औषधे, साफसफाई साहित्य, ताटवाट्या, बादल्या, नवीन टीशर्ट, साबण इ. उपलब्ध करुन दिले”

सेवा भारती, पिंपरी-चिंचवड, स्वास्तिक फौडेशन, पतंजली परिवार, स्नेह फौंडेशन इंद्रायणी नगर, इटॉन कंपनी, नॉव्हेल इंस्टीट्युट, पिंपरी चिंचवड मधील केरळ मित्रपरिवार यांचेबरोबरच खासदार अमर साबळे, अनिल फरांदे, धनंजय काळभोर, अमित गावडे, अनुप मोरे, कर्नल रविकांत कदम, प्रदीप कृपलानी आदींनी भरीव मदत जमा केली. ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे अध्यापक प्रमोद सादुल व युवक विभागाचे  तीन सदस्य या वाहनांसोबत केरळला गेले आहेत. यावेळी खासदार अमर साबळे, विनोद बन्सल, सुभाष जयसिंघानी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.