Vehicle Theft : चाकण, तळेगाव मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण मधून दोन, तर तळेगाव दाभाडे परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 14) चाकण आणि तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोहन अण्णाराम चौधरी (वय 35, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चौधरी यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी 26 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 27 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला.

गीता महेशकुमार पाठक (वय 31, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांनी देखील चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाठक यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी 11 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 12 सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

ऋषिकेश संजय पोटरे (वय 23, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोटरे यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी सोमवारी (दि. 13) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास पायोनियर हॉस्पिटलच्या समोर पार्क केली. रात्रीच्या वेळी त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.