Vehicle Theft : भोसरी, निगडी, सांगवीतून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – वाहन चोरीचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटना रोखण्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. भोसरी, निगडी आणि सांगवी मधून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

संदेश मारुती डुंबरे (वय 46, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डुंबरे यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / सी क्यू 0104) अज्ञात चोरट्यांनी पीएमटी चौक, भोसरी येथून चोरून नेली. हा प्रकार 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या कालावधीत घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सागर बाळासाहेब बोराडे (वय 31, रा. निगडी गावठाण) यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई एक्स 0059) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 16) दुपारी साडेतीन ते रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडला. बोराडे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

अमोल भास्कर पाटील (वय 32, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ डब्ल्यू 7243) अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरून चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.