Chinchwad News : निगडी, चाकण, तळेगाव मधून तीन दुचाकी वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – निगडीमधून डिस्कवर, चाकण मधून पल्सर तर तळेगाव मधून मोपेड दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीरेंद्र सिंग प्रेमसिंह बिस्ट (वय 26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांची 30 हजार रुपये किमतीची डिस्कवर दुचाकी (एम एच 12 / जे ई 6438) अज्ञात चोरट्यांनी आकुर्डी येथील महापौर बंगल्याजवळून चोरून नेली. याबाबत बिस्ट यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलीप शिवाजी सूर्यवंशी (वय 23, रा. कुरुळी, ता. खेड) यांची एक लाख 20 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एम एच 14 / ए जे 4452) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. याबाबत सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रोहिणी राहुल ओव्हाळ (वय 52, रा. तळेगाव स्टेशन) यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जी डब्ल्यू 9710) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. ओव्हाळ यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.