Wakad: वाकड, सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

Three two-wheelers were stolen from Wakad, Sangvi area

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन शिथिल होताच शहरात वाहनचोर पुन्हा सक्रिय झाले आहेत. शहरातील वाकड आणि सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याची नोंद गुरुवारी (दि. 28) करण्यात आली आहे.

वाहन चोरीची पहिली घटना डांगे चौक येथे घडली. हनुमान चंद्रभान धस (वय 34, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 मे रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान फिर्यादी धस यांनी आपली 30 हजार रुपये किंमतीची (एमएच 14 एचई 1138) ही दुचाकी वाकडरोड, डांगे चौक येथील टीजेएसबी बँकेच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची दुसरी घटना दि. 21 मे रोजी उघडकीस आली. दीपक जगन्नाथ कानडे (वय 46, रा. पिंपळे सौदागर गावठाण) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 मे रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास फिर्यादी कानडे यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची (एमएच 14 सीए 5405) ही दुचाकी राहत्या घरासमोर पार्क केली होती. रात्री चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीची तिसरी घटना वाकड येथे घडली. शाम भीमराव पाखरे (वय 43, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाखरे यांनी आपली 30 हजार रुपये किंमतीची (एमएच 12 एलयू 9726) ही दुचाकी दि. 22 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भुजबळ चौक येथे उभी केली होती. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like