Pune News : दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून सहा वाहनांची तोडफोड, तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज : दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारल्याने एका स्वयंघोषित भाईने साथीदारांच्या मदतीने सिंहगड रस्ता परिसरात गोंधळ घातला. त्याने तिघांना बेदम मारहाण करीत सहा वाहनांची तोडफोड केली. सिंहगड रस्त्यावरील माणिक बागेत बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी हनुमान मोरे यांनी फिर्याद दिली असून आरोपी करण दळवी आणि हनुमान या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की सिंहगड रस्त्यावर फिर्यादी यांची ऑटोमोशन इंजिनिअरिंग कंपनी आहे.

_MPC_DIR_MPU_II

बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपी करण दळवी हा या कंपनीच्या पायऱ्यावर बसला होता.  बसल्यानंतर करण दळवी हा इतर पायऱ्यावर थुंकत होता. यावेळी दुकानात असलेले फिर्यादी हे बाहेर आले आणि त्यांनी करण दळवी आला इथे थुंकु नका, सध्या कोरोनाचा काळ आहे. संसर्ग होऊ शकतो असे सांगितले.

यावरूनच त्यांच्यात वाद झाला. आरोपीने फिर्यादी यांनाच दमबाजी करत ‘तू मला ओळखत नाहीस, मी सिंहगड रोडचा भाई आहे, तुला संपवून टाकीन’ असे म्हणत फिर्यादी यांना दमबाजी केली आणि फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तर दुसऱ्या आरोपीने बाजूला पडलेला दगड फिर्यादीच्या दिशेने भिरकावला.

फिर्यादीने तो चुकल्याने दुकानाच्या काचा वर जाऊन लागला. त्यानंतर फिर्यादीची इतर सहकारी आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दुकानासमोर असणाऱ्या सहा वाहनांची तोडफोड केली. सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.