Pimpri : पिंपरी आणि चिखलीमधून एक लाखाची तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि चिखली परिसरातून एक लाखाची तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत धर्मेंद्र देवानंद पासवान (वय 29, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्मेंद्र यांनी त्यांची एम एच 14 / एफ यु 2949 ही दुचाकी घरासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दुचाकीच्या डिकीमध्ये एक मोबाईल व घड्याळ होते. एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी पहाटे चार ते सकाळी नऊ या कालावधीत घडली.

दुस-या घटनेत हरेश खानचंद थतई (वय 54, रा. शनी मंदिर जवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थतई यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी ई 7056 ही दुचाकी राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 29 जानेवारी रोजी सकाळी सव्वासात ते पावणे आठ या कालावधीत घडली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

तिस-या घटनेत वाहिद मकबूल पटेल (वय 23, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी झेड 5698 ही दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरटयांनी पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

रुग्णवाहिकेमधून गॅस सिलेंडर चोरीला

हॉस्पिटलच्या समोरील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या  रुग्णवाहिकेमधून अज्ञात चोरट्यांनी तीन हजार रुपये किमतीचा दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता जीवनरेखा हॉस्पिटल देहूरोड येथे घडली. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक सनी सुरेश कदम (वय 26, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.