Dehuroad : चाकण, देहूरोडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 18) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमाराम आदाराम चौधरी (वय 42, रा. चिंबळीफाटा, कुरुळी. मूळ रा. राजस्थान) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी यांनी त्यांची एम एच 14 / बी क्यू 1621 ही दुचाकी चिंबळीफाटा कुरुळी येथील जयश्री सुपर मार्केट समोर मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास पार्क केली. अज्ञात चोरट्याने तिथून चौधरी यांची दुचाकी चोरून नेली.

श्रीराम कृपा यादव (वय 31, रा. निघोजे. मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 12 / एम के 8525 दुचाकी निघोजे येथील महिंद्रा गेट नंबर दोनवर 19 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पार्क केली. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सायंकाळी सातच्या सुमारास ते काम संपवून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.

राजेश शिवलिंग माळी (वय 44, रा. आकुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश यांनी त्यांची एम एच 14 / सी क्यू 9761 ही दुचाकी मुकाई चौक, किवळे येथे 4 सप्टेंबर रोजी पार्क केली. चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.