Chinchwad News : तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

34 वर्षीय नराधमास अटक

एमपीसी न्यूज : चिंचवड परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर एका 34 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी घडली.

याबाबत पीडित मुलीच्या 21 वर्षीय आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 34 वर्षीय नातेवाईक व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी एकाच भागात राहतात. फिर्यादी यांना तीन वर्ष तीन महिन्यांची मुलगी आहे. आरोपीने मुलीला कशाचेतरी अमिश दाखवून तिला त्याच्या घरी नेले. तिथे मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.