Pimpri : शहरातील तीन योगपटूंची आठव्या एशियन स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – केरळ येथील तिरूअनंतपुरम येथे होणा-या आठव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील आंतरराष्ट्रीय योगपटू देवदत्त भारदे, सुशांत तरवडे, चंद्रकांत पांगारे हे तीन योगपटू रवाना झाले आहेत.  ही स्पर्धा 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

जीमी जॉर्ज इंडोर स्टेडियम येथे योगा असोसिएशन ऑफ केरळ यांच्या वतीने योगा फेडरेशनच्या नियमानुसार व योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सिंगापूर, थायलंड, मलेशिया, चीन, श्रीलंका, साऊथ कोरिया, व्हिएतनाम आदी 14 देशातील 450 पेक्षा जास्त योग स्पर्धेत  सहभागी होणार आहेत.

शहरातील आंतरराष्ट्रीय योगपटू देवदत्त भारदे, सुशांत तरवडे, चंद्रकांत पांगारे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. देवदत्त व सुशांत यांनी प्रत्येकी 3 तर पांगारे यांनी 7 आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. इंडियन योगा टीममध्ये महाराष्ट्राचे जतिन सोळंकी, अनिता पाटील या आंतरराष्ट्रीय योग पंचाचा समावेश आहे, अशी माहिती पुणे डिस्ट्रीक योगाच्या विद्या महाले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.