Pimpri : संत निरंकारी मिशनद्वारे युवा वर्गासाठी रविवारी इंग्रजी माध्यमातून सत्संग

एमपीसी  न्यूज –   निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, विजयनगर काळेवाडी येथे रविवारी दि. ३० सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते एक यावेळेत युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विशाल आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संगचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला पुणे झोनमधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, जय-जवान नगर येथून बालक-युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी इंग्रजी माध्यम सत्संग केवळ शहरात न घेता जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. याच आदेशाचे पालन करून या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशाल सत्संग सोहळ्यात “राकेश मूटरेजा जी” (युवा प्रचारक, दिल्ली) उपस्थित राहणार आहेत. या विशाल सत्संगामध्ये नाटक, गीतगायन, विचार तसेच आध्यात्मिक प्रदर्शनीच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या  इंग्रजी माध्यम सत्संगचा लाभ परिसरातील सर्व आबालवृद्धांनी घ्यावा अशी माहिती पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.