Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स चौक येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

हेमंत बाबू तेलंगी (वय 28, रा. निगडी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत गुरुवारी पहाटे थरमॅक्स चौकाजवळ दुधाच्या कंपनीला मोबाईलमधून लोकेशन पाठवत होते. त्यावेळी पांढ-या रंगाच्या मोपेड दुचाकीवरून चार अनोळखी तरुण आले. त्यांनी हेमंत यांना कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हेमंत यांनी प्रतिकार केला. आरोपींनी कोयत्याने हेमंत यांच्या हातावर वार केले. यामध्ये हेमंत जखमी झाले. हेमंत मोठ्याने ओरडले असता त्यांचे मित्र त्यांच्याकडे धावत आले. मित्र आल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.