Pune : बैलगाडा शर्यतीदरम्यान घोड्याने उडवलं पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक घटना

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यती दरम्यान ( Pune ) एक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. शर्यत ऐन रंगात आली होती. पुढे घोडी आणि मागे बैलगाडा पळत होता. मात्र इतक्यात एक मुलगा समोर आला आणि एक दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने हा मुलगा थोडक्यात बचावला आहे.

Pune : मारीगोल्ड आयटी पार्कला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर

बैलगाडा धावत असताना अचानकपणे मध्ये आलेल्या एका मुलाला घोडीने तुडवले. मुलगा तिथेच आडवा पडला. घोडीच्या पाठोपाठ भरधाव वेगात धावणारी बैलजोडी होती. मात्र मुलगा पडल्याचं पाहून बैलानेच प्रसंगावधान दाखवले असे म्हणावे लागेल. कारण या बैलाने या मुलाच्या अंगावरून उडी मारली आणि हा मुलगा थोडक्यात बचावला. आणि हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, घाटातून बैलगाडा आणि घोडी पळत असताना सर्वांनी पळ काढला. मात्र एका मुलाला पळ काढण्याची संधी मिळालीच नाही. घोडी समोर दिसताच हा मुलगा अचानक बीचकला आणि थेट घोडीच्या समोर आला. यामुळे घोडीची आणि या मुलाची धडक झाली आणि हा मुलगा आणि घोडी दोघेही खाली पडले. घोडीपाठोपाठ बैलगाडी होतीच. मात्र बैलाने उडी मारली आणि त्याच्या अंगावरून पुढे निघून गेला. यामुळे या मुलाचा जीव वाचला (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.