Thugaon Crime News : थुगावात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : मावळातील थुगाव गावात जुगार खेळणाऱ्यांवर वडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.2) सायंकाळी पाच वाजता कारवाई केली. यामध्ये तब्बल 4 लाख 59 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलीस हवालदार राम भोसले यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे व पोलीस हवालदार राम भोसले हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना थुगाव गावच्या हद्दीतील पवना हॅचरी कंपनीसमोर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाव कारवाई केली.

यामध्ये शांताराम मारुती कदम ( वय 53, रा. चिखलसे), भारत हरिबा लेंडवे (वय 53, रा. बऊर), पोपट सदाशिव शिंदे (वय 38, रा. मळवंडी ढोरे) अंकुश शिवराम खिरड (वय 50, रा.बऊर), सुरेश गेणु सावळे (रा. थुगाव), किरण काळभोर (रा. बेबडोहळ), अवि मालपोटे हे तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

या कारवाईत एकूण 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कार व दोन दुचाकी वाहनाचा समावेश आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस हवालदार राम भोसले करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.