Pune : शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी वारजे आणि नवीन होळकर या सर्व जलकेंद्र वरील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी आणि पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा गुरुवारी, 24 जानेवारीला  दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्यामध्ये काटकसर करणे गरजेचे आहे.

दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसापूर्वी पार्वती पंपिंग स्टेशन येथे व्हॉल्व्ह तुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे पुण्यातील पाणी प्रश्न हा चर्चेचा विषय बनत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.