Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमध्ये “ती” चा गणपती महोत्सव

उन्नती सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील उन्नती फाऊंडेशनच्यावतीने यंदा उन्नतीचा गणपती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परिसरातील महिलांनी एकत्र येऊन हे पहिले गणपती मंडळ सुरु केले आहे.  या मंडळाच्या माध्यमांतून समाजातील सर्व स्तरांतील  महिलांना एकत्रित घेऊन हा महोत्सव साजरा कऱण्यात येणार आहे, अशी माहिती उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व अध्यक्ष संजय भिसे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी पुढारींच्या हस्ते आरती कऱण्यात येते पण जी महिला रात्रंदिवस कष्ट करीत असते. ती मात्र यापासून वंचित राहते. त्यासाठी गणेशोत्सवात आरतीचा मान हा दृष्टीहिन, दिव्यांग मुली, महिला डॉक्टर, परिचारिका, महिला पोलीस अधिकारी, विधवा, महिला सफाई कामगार, गृहनिर्माण सोसायट्यांमधील महिला अध्यक्षा, तृतीयपंथी यांना असणार आहे. हा महोत्सव सात दिवस चालणार असून या सात दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.