Nashik News : बाजारपेठेत जाण्यासाठी आता तिकीट

नाशिकमध्ये लॉकडाऊनआधी कठोर पावले

एमपीसी न्यूज : नाशिकमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत.

  • बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क.
  • एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड.
  • वाढत्या करोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते केले बंद.
  • बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार.
  • महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार.
  • शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार.
  • बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.
  • मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.
  • सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.