Tiger reacts on Nepotism : स्टारकिड असण्याचा फायद्यापेक्षा दबावच जास्त – टायगर श्रॉफ

The pressure outweighs the benefits of being a starkid - Tiger Shroff अभिनेता जॅकी श्रॉफ याच्या मुलाने म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफने याप्रकरणी त्याचं मत मांडलं आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटक्षेत्रात एकच गदारोळ उडाला. अनेक बाजू समोर आल्या. सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरीदेखील कलाविश्वातील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या क्षेत्रात ‘आऊटसायडर’ ठरलेल्या सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी येथील प्रस्थापित स्टारकिड्सवर निशाणा साधला आहे.

मात्र अभिनेता जॅकी श्रॉफ याच्या मुलाने म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफने याप्रकरणी त्याचं मत मांडलं आहे. त्याच्या मते स्टारकिड असल्यामुळे कलाविश्वात वावरताना कायम दबावच असतो, असं त्याने म्हटलं आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरने  हिरोपंती या चित्रपटाच्या माध्यमातून २०१४ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. ‘बागी’, ‘वॉर’,’मुन्ना मायकल’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, अशा काही चित्रपटांमध्ये टायगरने काम केलं आहे. मात्र, त्याच्या अभिनयाची  फारशी भुरळ प्रेक्षकांवर फारशी पडली नाही. तो अ‍ॅक्शन हिरो म्हणूनच जास्त ओळखला जातो.  जॅकी श्रॉफने आपल्या वेगळ्या अंदाजाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले होते. जॅकी येथे ‘आऊटसायडर’च होता.

_MPC_DIR_MPU_II

‘जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असल्यामुळे आणि एक स्टारकिड असल्यामुळे कायम माझ्यावर काम करताना दबाव होता. लोकांना वाटतं की स्टारकिड असणं सहज-सोपं काम आहे. पण, तसं प्रत्यक्षात नसतं. मी खोटं सांगणार नाही, पण सतत डोक्यात हा विचार घोळत असतो. जे स्टारकिड आहेत आणि ज्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यांच्यासाठी हे सारं सोपं आहे. मीदेखील माझ्या वडिलांच्या छत्रछायेतून मी बाहेर पडलो’, असं टायगर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ‘माझ्या वडिलांनी जवळपास ३० वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी करिअरमध्ये येणारे चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांनी मला कायम सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता मी स्वत:चं या विश्वात नाव कमावलं आहे. त्यामुळे अनेक जण सहज माझ्यावर टीका करतात. माझ्यावर काही मीम्सदेखील तयार होता आणि लोक मला ट्रोलही करतात. मात्र या सगळ्याकडे मी सकारात्मकतेने पाहतो. मला राग किंवा वाईट वाटत नाही. मी ते मीम्स एन्जॉय करतो’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.