TikTok – सेलिब्रिटींपेक्षाही लोकप्रिय असलेले टिक-टॉक स्टार मिळवतात कोट्यवधीची संपत्ती

Tik-tok stars, who are even more popular than celebrities, make billions

एमपीसी न्यूज – सध्या सोशल मिडियाची चलती आहे. लॉकडाऊनच्या या काळात मनोरंजनासाठी अनेक माध्यमे वापरली जातात. यातील टिक-टॉक आणि यूट्यूब हे इंटरनेटवर सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले जाते. जगभरातील कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्म्सचा मनोरंजनासाठी वापर करतात. पण या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? असा वाद सध्या सोशल मीडियावर पेटला आहे.

त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र धक्कादायक गोष्ट अशी की या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कलाकार हे सेलिब्रिटींपेक्षाही लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळतेय. आणि ते घेत असलेल्या मानधनाचे आकडे तर तुम्हाला थक्कच करतील.

टिक-टॉक स्टार आवेज दरबार हा सध्याचा अतिशय लोकप्रिय कलाकार आहे. त्याचे २५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच topplanetinfoने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्याकडे १.५ मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्याचबरोबर अरिश्फा खान हिचे टिक-टॉकवर २६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्याकडे जवळपास १ मिलियन डॉलर संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. तिने छोट्या पडद्यावरील ‘एक वीर की अरदास वीरा’ या मालिकेमध्ये काम केले आहे.

टिक-टॉक सुपरस्टार रियाज अलीचे ३८.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.  त्याच्याकडे ०.८ मिलियन इतकी संपत्ती असल्याच्या चर्चा आहेत. रियाज एक फॅशन ब्लॉगर म्हणून देखील लोकप्रिय आहे.

जन्नत जुबैरचे टिक-टॉकवर २६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्याकडे जवळपास १ मिलियन डॉलर एवढी संपती आहे. तिने आशिकी या मालिकेत काम केले आहे.

टिक-टॉकस्टार निशा गुरागैनचे २५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्याकडेही ०.५ मिलियन डॉलर संपत्ती असल्याच्या चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.