Tikona Fort News : श्रमदानातून तिकोना गडावर 150 दगड पोहोचले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील तिकोना गडावर दर रविवारी श्रमदान मोहीम राबविण्यात येते. या रविवारी (दि. 14) देखील ही मोहीम राबविण्यात आली. यात गडप्रेमींनी तब्बल 150 दगड पायथ्यापासून गडावर पोहोचवले.

तिकोना गडावर आगामी काळात दुर्गसंवर्धनाचे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे दर रविवारी गडावर श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. भर उन्हात देखील मावळे दुर्गसंवर्धनाचे काम करत आहेत.

तिकोना गडावर दर रविवारी श्रमदान केले जात आहे. सलग तिसऱ्या रविवारी श्रमदान करण्यात करण्यात आले. त्यात गडप्रेमींनी 150 दगड तिकोना गडाच्या पायथ्यापासून गडावर नेले. गडप्रेमींचे असेच योगदान मिळाल्यास पुढील काळात होणाऱ्या दुर्गसंवर्धन मोहिमेत मोठी मदत होणार आहे. दुर्गसंवर्धन मोहिमेत मदत करणाऱ्या सर्व शिवप्रेमी, शंभुप्रेमींचे गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.