Maval Crime News : टायर दुकानाचा वाद, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : टायरच्या दुकानावरुन झालेल्या वादात दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी (दि.7) सकाळी आठच्या सुमारास उर्से, ता. मावळ येथे घडली. 

सोमा मसुगडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, बाबु वाळुंज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नुडुल खुदा सोहेल अन्सारी (वय 27, रा. कामशेत, मावळ) यांनी शुक्रवारी (दि.8) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नुडुल खुदा याच्या टायरच्या दुकानावरुन जाऊन ‘हे टायर दुकान काढुन टाका येथे आम्हाला टायरचे दुकान टाकायचे आहे’ असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी केली. आरोपी बाबु वाळुंज याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी पाईप जोरात मारून गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.