Talegaon Dabhade : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची इंद्रायणीत उडी मारत आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी ने इंद्रायणी नदीत उडी मारत अवघ्या दीड महिन्याचा संसार संपवला आहे. ही घटना 3 जुलै रोजी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी मंगलकार्यालय जवळील नदी पात्रात घडली.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पती कौशल पिराजी भोसले (रा. तपोधाम,तळेगाव दाभाडे) याला अटक केली असून एका महिलेने बुधवारी (दि.5) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत तरुणी व आरोपीचा 17 मे रोजी लग्न झाले होते. मात्र आरोपीने माहेर वरून पैसे आण, दुचाकी आण व लग्ना आधीची एक वर्षाची पगार आण म्हणत  तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्याच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने नदीत उडी घेत आत्महत्या केली. तळेगाव (Talegaon Dabhade) एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.