TMKOC Gokuldham society : ‘ती’ आली तर ठीक, नाही तर आमचे काही अडत नाही…

मालिकेत दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वकानीला मालिकेत परत येण्यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु तिने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.

एमपीसी न्यूज – गोकुलधाम सोसायटीमधील रहिवाश्यांच्या कारनाम्यांवर प्रेक्षक बेहद्द खूष आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. याच मालिकेतून नावारुपास आलेली अभिनेत्री दिशा वकानी उर्फ दयाबेन मालिकेत पुन्हा कधी परतणार, असा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत.

दिशाने तिच्या लग्नाच्या निमित्ताने मालिकेतून ब्रेक घेतला. आता दिशाचे बाळ देखील मोठे झाले आहे. अडीच वर्षानंतरही ती या मालिकेत परतलेली नाही.

नुकतीच ‘तारक मेहता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत निर्माता असित मोदी यांनी दयाबेन या व्यक्तिरेखेबाबत मोठं विधान केलं. दिशा वकानी पुन्हा आली तर ठीक नाहीतर आमचं तिच्यावाचून काही अडत नाही, असं ते म्हणाले.

दयाबेन ही ‘तारक मेहता’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. जेठालाल आणि दयाबेन यांच्या मुख्य व्यक्तिरेखा या मालिकेत आहेत. अनेक प्रसंग या व्यक्तिरेखेभोवती फिरताना आपण पाहिले आहेत. आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून दिशाने या भूमिकेला प्रचंड लोकप्रिय केलं. मात्र दयाबेनला पुन्हा कधी पाहायला मिळणार? याबाबत असित मोदी यांनी मोठं विधान केलं.

ते म्हणाले, ‘आम्ही दिशाला मालिकेत परत येण्यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु तिने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. दिशा वकानी पुन्हाआली तर ठीक नाहीतर आमचं तिच्यावाचून काही अडत नाही. गेल्या अडीच वर्षांपासून दयाबेन नसतानाही मालिका सुरु आहे. पण मालिकेच्या टीआरपीवर काहीही परिणाम झालेला नाही. आजही प्रेक्षक आमच्यावर तितकेच भरभरुन प्रेम करत आहेत. कुठलीही मालिका एका व्यक्तीमुळे नव्हे तर संपूर्ण टीममुळे चालते. आमची टीम खूप चांगलं काम करत आहे. गेल्या अडीच वर्षात दिशा वकानीची कमतरता आम्हाला बिलकुल भासलेली नाही’.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.

View this post on Instagram

World🌍

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.