kasarwadi : राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने मानसिक संतुलन राखण्यासाठी “पथनाट्य”

एमपीसी  न्यूज –  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने काळाची गरज पाहता १६ ते ४० या वयोगटातील मुलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करून याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनात व्हावा व त्यांचा येणारा दिवस मानसिक त्रासापासून मुक्त व्हावा, यासाठी चैतन्य इन्स्टियूटतर्फे युवकांमधील नैराश्य उदासिनता आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव यांवर मानसिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने पथनाट्ये सादर करण्यात आली.

कासारवाडी येथील साई शारदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर प्राचार्य पाटील महापौर संजोग वाघेरे-पाटील,  शिक्षण मंडळ सभापती फजल शेख, प्रदीप गायकवाड, रशिद सय्यद यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थ‍िती होती. कार्यक्रमाचे संयोजन युवती वर्षा जगताप यांनी केले तसेच गंगा धेंडे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष, कविता खराडे अध्यक्ष महिला बचत गट महासंघ  पिंपरी-चिंचवड शहर,  मेघा पवार,  मेघना जगताप, शिल्पा बिडकर यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like