गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pune News : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका 21 ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल बांधणार

एमपीसी न्यूज : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या 21 ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पूल उभारण्याचा महापालिका प्रशासन विचार करीत आहे.(Pune News) त्यासाठी येत्या काही दिवसांत सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून सल्लागाराच्या अहवालानंतर कामे सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रमुख चौकात अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. वाहतूक समस्येसंदर्भात नागरिक आणि स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटनांनी महापालिकेकडे उपाययोजना करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. त्यानुसार आता उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्याचे महापालिकेने नियोजित केले आहे.

Pune : पिफ महोत्सव कव्हर करण्यासाठी पत्रकारांना नोंदणीचे आवाहन

मोठे रस्ते, नदी आणि लोहमार्ग अशा विविध ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक खासगी लोकसहभागातून यापूर्वी काही ठिकाणच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ती कामेही सध्या सुरू आहेत, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराला दोन हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि मोठ्या रस्त्यांवरील (Pune News) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच अन्य कामे करण्यासाठी महापालिका स्तरावर प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

Latest news
Related news