Bhosari : भोसरीमधील हॉस्पिटल सुरु करा

शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांची आयुक्तांकडे मागणी, वाय.सी.एम.हॉस्पिटलवर वाढतोय भार

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भोसरी येथे 100 बेड हॉस्पिटल अनेक वर्ष चालू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. तरी भोसरी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांतून केली आहे.

या दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भोसरी येथे नवीन हॉस्पिटलचे काम सुरु आहे. शहराची लोकसंख्या आणि तुलनेने रोजगारासाठी येणा-यांची संख्या पाहता सर्व वैद्यकीय बोजा वाय.सी.एम.हॉस्पिटलवर पडत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने डॉक्टर यांची कमतरता भासते.

परिणामी रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळेच महानगरपालिकेच्यावतीने भोसरी येथे या हॉस्पिटलची निर्मिती केली खरी पण वेगवेगळ्या कारणास्तव ते धूळखात पडून आहे. वैद्यकीय विभाग शक्तीशाली बनविण्यासाठी हे हॉस्पटल चालु होणे गरजेचे आहे. भोसरीमधील गरीबांसाठी हे हॉस्पटल वरदान ठरणार आहे. लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरु करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.