Pimpri : लग्नाची बोलणी करण्यास आलेल्या प्रेयसीच्या डोक्यात दगड टाकून खून

एमपीसी न्यूज – लग्नाची बोलणी करण्यास आलेल्या प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविंद्र ससाणे (वय 38, रा. भोसरी), यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आकाश उर्फ अक्षय लाखे (वय 20, रा. नाशिक रोड) याला अटक करण्यात आली आहे.

किरण काते, (वय 23, रा. पिंपरी), असे मयत प्रेयसीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रेयसी किरण हीचे आरोपी आकाश हिच्या सोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे किरण ही गुरुवारी (दि.23), आकाशच्या घरी लग्नासंदर्भात बोलणी करण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यात वाद विवाद झाल्याने आकाशने किरण हिच्या डोक्यात दगड आणि विटाने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी आकाशवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.