Tobacco sale : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज : गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी दोघांना घटक केली.(Tobacco sale) ही कारवाई गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेबारा वाजता चाकण-आंबेठाण रोडवर बिरदवडी येथे करण्यात आली.
प्रशांतकुमार रामकुमार (वय 23, रा. रासे, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश), अनुराग अजय नारायण पंडित (वय 27, रा. रासे, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत कुमार याने अनुराग यांच्याकडून प्रतिबंधित गुटखा विकत घेतला. तो गुटखा आरोपी प्रशांतकुमार विक्रीसाठी दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले.(Tobacco sale) त्याच्याकडून 76 हजार 237 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.