Pune : Tocilizumab इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण होतायेत बरे – महापौर मुरलीधर मोहोळ

Tocilizumab Injection Cures Corona Patients - Mayor Muralidhar Mohol

एमपीसी न्यूज –  Tocilizumab या इंजेक्शनचे दोन डोस कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्यानंतर काही रुग्ण बरे झाले आहेत. या इंजेक्शनच्या वापराने पुणे शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देखील कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे तज्ञ डॉक्टर्सची एक टास्क फोर्स कार्यरत आहेत.

या टास्क फोर्समधील तज्ञांनी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांचा अभ्यास करून काही निरिक्षणे नोंदवली आहेत. तसेच काही शिफारशी देखील केलेल्या आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने Tocilizumab या इंजेक्शनचे दोन डोस कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्यानंतर काही रुग्ण बरे झाले आहेत.शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देखील कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापौर  मोहोळ यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेने स्वतःचा निधी खर्च करून तातडीने या प्रकारची ५० इंजेक्शन खरेदी केलेली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी व शहरातील नागरिकांचा संक्रमणापासून बचाव करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच नागरिकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. Injection Tocilizumab हे इंजेक्शन पुणे महानगरपालिका ससून रूग्णालयास मोफत देत आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ६६ टक्क्यांवर आहे. ही समाधानाची बाब असली तरी मृत्युदरही जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tocilizumab या इंजेक्शनचा गंभीर कोरोनाबधितांना मोठा आधार असून यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही.

भविष्यातदेखील पुणे महानगरपालिका याचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि शहरातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहील’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.