Maharashtra Corona Update : आज 14,219 जणांना डिस्चार्ज, राज्यातील 5 लाखांहून अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त

Today 14,219 persons discharged, more than 5 lakh patients in state corona free.

एमपीसी न्यूज – राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज दिवसभरात 14 हजार 219 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजवर 5 लाखांहून अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 11 हजार 015 नवे कोरोनाबाधित आढळले असून, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 93 हजार 398 एवढी झाली आहे.

त्यापैकी सध्या 1 लाख 68 हजार 126 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील आजवर 5 लाख 02 हजार 490 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.47% झाले आहे.

राज्यात आज दिवसभरात 212 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 22 हजार 207 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.24 टक्के एवढा आहे.

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर कायम आहे. गावागावात संसर्ग पसरण्याचा वेग वाढला आहे. पुणे जिल्ह्यात अजूनही सर्वाधिक कोरोना रुग्ण असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही याच जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

आजवर पाठवण्यात आलेल्या 36 लाख 63 हजार 488 नमूण्यापैकी 6 लाख 93 हजार 398 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात 12 लाख 44 हजार 024 जण होम क्वारंटाइन आहेत तर 33 हजार 922 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.