Maval Corona Update: आज 156 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, तर 135 जणांना डिस्चार्ज

Today, 156 patients tested positive, while 135 were discharged.

एपीसी न्यूज- मावळ  तालुक्यात शनिवारी (दि.15)  156 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून, आतापर्यंत 334 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत  वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून, आतापर्यंत 334 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2197 आहे.

शहरी भागात 117 तर ग्रामीण भागात 39 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 94 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रुग्ण सापडले.  वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 10 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16,934  झाली आहे. तर दिवसभरात 135 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात  कुसगाव बुद्रुक 16, कामशेत 5, कान्हे 4, डोंगर गाव 3, नाणे 3, नायगाव 2, आपटी, ब्राम्हणवाडी साते, केवरे, कुसगाव खुर्द, मोहितेवाडी व वडगाव  प्रत्येकी 1 असे एकूण 39  रुग्ण सापडले.

14,403  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आतापर्यंत 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5802, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3211 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 925 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9938 रुग्ण तर ग्रामीण भागात 6996 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 85.05 टक्के आहे तर  मृत्यू दर 1.97 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषद मध्ये 775 लोणावळा नगरपरिषद मध्ये 389 वडगाव नगरपंचायत मध्ये 102  व ग्रामीण भागात 931 असे एकूण 2197 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.