Maharashtra Corona Update : राज्यात आज 16,577 जणांना डिस्चार्ज, 10,891 नवे रुग्ण 

Today 16,577 patients discharged and new 10,891 patients in state.

एमपीसी न्यूज – राज्यातील करोना संसर्ग आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. तर, मोठ्यासंख्येने रूग्ण कोरोनातून बरे देखील होत आहेत. आज दिवसभरात राज्यात 16 हजार 577 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद झाली. 

राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.35 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 67 हजार 927 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 69 लाख 07 हजार 181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 52 हजार 891 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 53 हजार 174 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.