Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,974 नवे रुग्ण, 8,562 जणांना डिस्चार्ज 

Today 9,974 new corona patients in state, 8,562 persons discharged.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) 9 हजार 974 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 8 हजार 562 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 लाख 36 हजार 821 एवढी झाली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 57 लाख 90 हजार 113 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 95.91 टक्के एवढं झाले आहे. सध्या राज्यात 1 लाख 22 हजार 252 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्रात आजवर 1 लाख 21 हजार 286 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आज दिवसभरात 143 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर दोन टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 10 लाख 42 हजार 198 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.