‘Bharat Bandh’ : आज ‘भारत बंद’ ; शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची दिली आहे हाक

एमपीसी न्यूज :केंद्र सरकारने  पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या  विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने  सोमवारी ‘भारत बंद’ची   घोषणा केली आहे. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ, कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशातील ५०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना व २० पेक्षा अधिक राजकीय पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई येथे ३०० पेक्षा अधिक जनसंघटना सहभागी असलेली जनआंदोलन संघर्ष समिती महाराष्ट्र बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

तर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारने भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

तसेच दिल्ली शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दिल्लीत भारत बंदची हाक नाही, पण आम्ही सध्याच्या घडामोडी पाहता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही सुरक्षा दले तैनात केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.