Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचा आज समारोप

डॉ. संजय उपाध्ये व डॉ. सतीश देसाई यांचे विचार ऐकण्याची संधी

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचा समारोप आज, शुक्रवारी ज्येष्ठ लेखक व प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये व पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला कांतीलाल शहा विद्यालयातील स्वर्गीय केशवराव वाडेकर सभागृहात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सुरु आहे.

पहिल्या सत्रामध्ये डॉ. सतीश देसाई यांचे ‘मी एक आनंद यात्री’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. संजय उपाध्ये हे ‘जिंकलो ऐसे म्हणा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके व नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे उपस्थित राहणार आहेत.

माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांनी केलेल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच हा सामाजिक वसा व वारसा विद्यार्थी, पालक व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक रामदास काकडे यांनी दिली. व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने विचारधन ऐकण्याची उत्तम संधी विद्यार्थी, पालकवर्ग, नागरिकांना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.