Today Horoscope 23 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरूवार दि. २३ जून २०२२ 
   
(Today Horoscope 23 June 2022)       

 

शुभाशुभ विचार — ०९.०० पर्यंत चांगला दिवस

 

आज विशेष – साधारण दिवस 

 

राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००

 

दिशा शूल – उत्तरेस असेल

 

आजचे नक्षत्र – रेवती ०६.१४ पर्यंत नंतर अश्विनी

 

चंद्र राशी – मीन ०६.१४ पर्यंत नंतर मेष
_________________________
आजचे राशीभविष्य (Today Horoscope 23 June 2022)     

 

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

 

एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. कार्यक्षेत्रात काही वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.

 

वृषभ – (शुभ रंग- जांभळा)

 

काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. काही अति हुशार मंडळींचा सहवास लाभेल डोके शांत ठेवलेले बरे.

 

मिथुन – ( शुभ रंग- मोरपिशी)

 

आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. सगळ्यांशी गोड बोलून स्वार्थ साधणे तुम्हाला चांगले जमेल.

 

कर्क – ( शुभ रंग -डाळिबी)

 

आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक  कामे सोपी होतील.

 

सिंह – ( शुभ रंग- सोनेरी)

 

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

 

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

 

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे.

 

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

 

आजचा दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल.
मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.

 

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

 

दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.

 

धनु – ( शुभ रंग- क्रीम)

 

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील.        उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

 

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

 

वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.

 

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

 

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी

 

मीन – ( शुभ रंग- मरून)

 

आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. व्यावसायिकांचे अंदाज खरे ठरतील. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल. अनपेक्षित काही रक्कम हाती येईल.

 

!! शुभम भवतु!!

 

श्री जयंत कुलकर्णी

 

फोन ९६८९१६५४२४

 

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.