Today’s Horoscope 24 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 November 2022

वार – गुरूवार

24-11-2022

शुभाशुभ विचार- 20 पर्यंत चांगला.

आज विशेष- देव दीपावली.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – अनुराधा 19.37 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————-

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
आज जितके आपल्या मर्यादित राहाल तितकेच चांगले राहील. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. सासुरवाडी कडून एखादा लाभ संभवतो. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणा, फार खोलात शिरू नका.

वृषभ (शुभ रंग- मरून)
भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळून बघा. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळणार आहे.

कर्क (शुभ रंग- पिस्ता.)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल, छान दिवस आहे.

सिंह (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस, कुठेही न जाता घरीच आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेणार आहेत. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)
प्रॉपर्टी विषयी मोठे आर्थिक व्यवहार असतील तर ते आज टाळा. प्रवासात काही नवीन नाती जुळणार आहेत, आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येतील त्यामुळे डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे.

तूळ ( शुभ रंग- राखाडी )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल मृदू वाणीने विरोधकांनाही तुम्ही आपलेसे करून घ्याल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील आशादायी दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरून तुम्हाला राग अनावर होईल. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे तुम्ही पुढे दामटवणार आहात.

धनु- (शुभ रंग- लाल )
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडणार आहेत. दुकानदारांनी उधारी शक्यतो टाळावी.

मकर ( शुभ रंग- लाल)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. अपुरी स्वप्न साकार होणार आहेत.

कुंभ (शुभ रंग – मोरपिशी )
आज तुम्ही आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाही. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. मनशांतीसाठी सत्संग शिवाय दुसरा पर्याय नाही

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.