Today’s Horoscope 5 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार शुक्रवार (Today’s Horoscope 5 August 2022)

शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.

आज विशेष — दुर्गाष्टमी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – स्वाती 18.37 पर्यंत, नंतर विशाखा.

चंद्र राशी –  तुळ.

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग राखाडी)

कौटुंबिक स्तरावरील काही मनाजोगत्या घटना आपल्या कार्य उत्साह वाढवतील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. मुलांचे लाड पुरवाल.

वृषभ  (शुभ रंग – डाळिंबी)

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग  सहज सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता)

आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी दूर  होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल.

कर्क (शुभ रंग- क्रीम)

आज गृह सौख्याचा दिवस कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्हाला समाधान वाटेल सज्जनांचे पाय घराला लागतील.

सिंह- ( शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमप्रकरणे डोक्याला ताप देतील.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमचा कार्य उत्साह इतरांना प्रभावित करेल. आज तुमच्या खिशात पैसाही खेळता राहील. इतरांना दिलेले शब्द पाळावे लागतील.

तुळ – ( शुभ रंग – लाल)

आज अनपेक्षित रित्या काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चाचेही विविध मार्ग तुम्हाला खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

वृश्चिक -( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति आत्मविश्वास आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल.

धनु (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील काही भाग्यवंतांना नवीन घराच्या चाव्या मिळतील. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल.

मकर- ( शुभ रंग- पांढरा)

उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घेण्यास विलंब होऊ देऊ नका. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाचा मान राहील. छान दिवस.

कुंभ ( शुभ रंग- निळा)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे आज तुमची वाटचाल सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांबच राहा. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन- ( शुभ रंग- गुलाबी)

आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

 

 

!! शुभम भवतु!!

 

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.