Today’s Horoscope 16January 2021; जाणून घ्या आजचे राशी भविष्य

आजचे पंचांग –
रविवार.
१६.०१.२०२२
शुभाशुभ विचार- १५ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
_______________________
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- तांबडा)
आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा माथेफिरू भेटू शकतो. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत यश वाटते तितके सोपे नाही.

वृषभ- ( शुभ रंग – मोतिया)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येऊ शकते. वाणीवर लगाम ठेवा.

मिथुन- ( शुभ रंग – क्रीम)
योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज दूरचे नातलग संपर्कात येतील.

सिंह- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)
अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तुळ – (शुभ रंग- जांभळा)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक- (शुभ रंग- आकाशी)
आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची आणि होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)
व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल.
इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर- ( शुभ रंग- निळा)
नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल. हितशत्रू टपून बसलेत, सतर्क राहा.

कुंभ – ( शुभ रंग- भगवा )
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

मीन- ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.