_MPC_DIR_MPU_III

Maharashtra Corona Update : आज 5,369 नवे रुग्ण, तर 3,726 जणांना डिस्चार्ज 

Today new 5,369 corona patients in State, 3726 persons discharged.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 5 हजार 369 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 3 हजार 726 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 15 लाख 14 हजार 079 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

_MPC_DIR_MPU_IV

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज झालेल्या रुग्णांच्या वाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 83 हजार 775 एवढी झाली आहे. त्यापैकी राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 109 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील 15 लाख 14 हजार 079 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 89.92 टक्के एवढा झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 113 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर‌ 44 हजार 024 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 90 लाख 24 हजार 871 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी  16 लाख 83 हजार 775 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 25 लाख 44 हजार 799 जण होम क्वारंटाईन आहेत तर,  12 हजार 230 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

काही दिवसांपासून राज्यातील कोरोना‌बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या सातत्याने अधिक आढळून आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही बरे होणा-या  संख्येपेक्षा अधिक आढळली आहे.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असला तरी देखील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत रोज भर पडताना दिसत आहे. त्यामुळे अजूनही अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.