Pimpri News: शहरात आज 627 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज तर 14 मृत्यू

Today new 627 corona patients in city, 713 persons discharged and 14 deaths.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 561 आणि पालिका हद्दीबाहेरील 66 अशा 627 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 82 हजार 503 झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 713 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 14 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवडगांवातील 66 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 66 वर्षीय, निगडीतील 40 वर्षीय, पिंपळेसौदागर येथील 63 वर्षीय, वाकड येथील 89 वर्षीय वृद्ध, दिघीतील 72 वर्षीय वृद्ध, पिंपळेगुरव येथील 67 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 64 वर्षीय महिला, पिंपरीतील 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी-चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात सातारा येथील 73 वर्षीय वृद्ध, कुरकुंडीतील 45 वर्षीय, खेड येथील 54 वर्षीय पुरुष, पुण्यातील 52 वर्षीय महिला, पंढरपूर येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 82 हजार 503 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 76 हजार 766 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1405 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 542 अशा 1947 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2761 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1078 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.