Pune : साठ वर्षातील सिंचनाचा पैसा गेला कुठे – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – साठ वर्षामध्ये सिंचनाचा पैसा व्यवस्थित वापरला असता तर गावे केव्हाच जलयुक्त झाली असती. गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, सरकारने कामे केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी असती असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले , आमीर खान याचं अभिनंदन करावं तितके कमी आहे. 1960 ते 2018 या काळातील आधीची आणि आताची सरकारे या सभागृहात बसली आहेत. मग इतकी वर्षांच्या इरिगेशनचा पैसा गेला कुठे. जर 60 वर्षात इरिगेशन विभागात पैसा मुरला नसता तर राज्याच्या पाणी पातळी घट झाली नसती.

ग्रामीण भागातील बंधू भगिनींना जागृत करण्याचे काम जर अमीर खान करत असेल तर सरकार करतय काय. पाण्याचा प्रश्न जर ज्वलंत होत असेल तर यासारखे दुसरे दुदैव नाही. अमीर बरोबर सरकारी अधिकारी काम करत असतील तर सरकार बरोबर का हे लोक का काम करत नाहीत, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी उपस्थित लोकांनी केली. त्यावर राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी करत श्रमदानाला मी नक्की येईन, कुदळ कशी मारायची मला माहिती आहे फक्त फावडे कसे मारायचा हे मला शिकवा.

मॅगेसिस नक्की घे – अमीर कुठले पुरस्कार घेत नाही, कुठलं अवॉर्ड घेत नाही, पण अमीर ज्यादिवशी ‘मॅगेसिस’ सन्मान मिळेल त्यादिवशी नक्की घे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावे आहेत
प्रथम क्रमांक – टाकेवडी (आंधळी) ता. माण, जिल्हा – सातारा, 75 लाख आणि ट्रॉफी

द्वितीय क्रमांक – भांडवली, (ता.माण, जिल्हा – सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जिल्हा – बुलढाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी

तृतीय क्रमांक – आनंदवाडी (ता.आष्टी) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.