Today’s Horoscope 3 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. मंगळवार 03 ऑगस्ट 2021

शुभाशुभ विचार – 13 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3 ते 4.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी 25.44  पर्यंत नंतर मृग

नक्षत्र पाया– सुवर्ण.

चंद्र राशी –  वृषभ.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – आकाशी)

विविध मार्गाने पैसा येईल. खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आज सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. गृहसौख्य लाभेल.

 

वृषभ – (शुभ रंग – पांढरा)

आज तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून निस्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळेल. विवाहित जीवनात सामंजस्य राहील. उपवरांना स्थळे सांगून येतील.

 

मिथुन – (शुभ रंग – मोरपिशी)

आज कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जाही वाढवावा लागणार आहे. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल.

 

सिंह – (शुभ रंग – डाळिंबी)

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. कायदा मोडण्याचा विचार स्वप्नातही करू नका.

 

कन्या – (शुभ रंग – सोनेरी)

शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. आजी-आजोबांनी फक्त नातवंडात रमणे हिताचे राहील.

 

तुळ – (शुभ रंग – चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी आज आपल्या कामाशिवाय फार खोलात शिरू नका. मित्र आज फक्त चुकीचे सल्ले देतील. मोह टाळा. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा.

 

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. वादविवादात तुमचे मत प्रभावी राहील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे संसारिक सुखासाठी चांगले.

 

धनु – ( शुभ रंग – भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

 

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधान कारक राहील. आज काही जुन्या मित्रांच्या सहवासात सध्याकाळचा वेळ मजेत जाईल.

 

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

प्रॉपर्टीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज यशादायी दिवस आहे.

 

मीन  – (शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वाद असतील तर  आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. व्यवसायात जाहिरातीवर खर्च करावा लागेल. मुले आज अभ्यासाचा कंटाळा करतील.

!! शुभम भवतु!!
– जयंत कुलकर्णी. 
फोन 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.